पिंपरी (Pclive7.com):- देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७ सप्टेंबर २०२२ ते २ ऑक्टोंबर २०२२ राष्ट्रपिता महात्मा गांधीजी जयंती पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे.

या सेवा पंधरवडा अंतर्गत २२ सप्टेंबर गुरुवार रोजी आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनानुसार भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर आणि दिनेश लालचंद यादव युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमानातुन कुदळवाडी या ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व कुदळवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group