पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड पोलिस स्टेशन येथे नवरात्र उत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने नवरात्र मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस चिंचवड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नवरात्र उत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या बैठकीस शांतता समिती सदस्य उपस्थित होते.

या प्रसंगी चिंचवड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी मंडळांना विविध सूचना मार्गदर्शन केले. मंडळांनी उत्सवादरम्यान घ्यावयाची काळजी, देवीची प्रतिष्ठापना, उत्सव काळात आयोजित केलेले कार्यक्रम तसेच गरबा दांडिया कार्यक्रमादरम्यान घ्यावयाची खबरदारी, वेळेची मर्यादा, आवाजाची तीव्रता कमी ठेवणे, महिला वर्गाची सुरक्षितता लहान मुलांची काळजी तसेच कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाची मदत इत्यादी अनेक विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी अनेक मंडळांनी विचारलेल्या प्रश्नांची सोडवणूक केली. तसेच याप्रसंगी शांतता समितीचे सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. पोलिस प्रशासन आपल्याबरोबर आहेच, आपली ते काळजी घेणार आहेतच. आपणही मंडळांनी पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना सहकार्य करावयाचे आहे. आपण कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहकार्य करायचे आहे, अशी विनंती मंडळांना केली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, पोलिस निरीक्षक गुन्हे प्रकाश जाधव यांचे मार्गदर्शन केले. तसेच आभार व्यक्त केले. या बैठकीचे नियोजन एल.आय.बी.चे सागर आढारी आणि उभे तसेच सुभाष मालुसरे यांनी केले होते.
























Join Our Whatsapp Group