पिंपरी (प्रतिनिधी):- दिवाळीनिमित्त निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे आकाशकंदील बनवा कार्यशाळा, किल्ले बनवा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. निगडी, प्राधिकरणातील, स्वातंत्र्यवीर सावरकर सदनात या स्पर्धा होणार आहेत.
१३ व १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार ते सात या वेळेत आकाशकंदील बनवा कार्यशाळा होणार आहे. यामध्ये बांबूच्या कामट्यापासून पारंपरिक आकाशकंदील तयार करायला शिकवला जाईल. त्यासाठी लागणा-या साहित्याचा पूर्ण संच नाममात्र किंमतीमध्ये उपलब्ध करुन दिला जाणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळेत ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या मैदानात किल्ले बनवा स्पर्धा होणार आहे. प्राथमिक, माध्यमिक व खुल्या गटात होणा-या स्पर्धांसाठी दगड, वीट, माती व पाणी मंडळाकडून मोफत उपलब्ध करून दिले जाईल. या दोन्ही स्पर्धेसाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. १६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत सवत्सधेनू पूजन आयोजित केले आहे.
संपूर्ण भारत देशात साजरा होणा-या सणांमध्ये प्राचीन, धार्मिक व ऐतिहासिकदृष्टीने महत्वाचा सण म्हणजे दिवाळी ! दिवाळी फराळ, नवीन कपडे, रोषणाई, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज पारंपरिकरित्या साजरी करताना एकमेकांना शुभेच्छा देऊन आनंद व समाधान देणारा हा सण, या सर्वांमध्ये मुलांमध्येही उत्साह कमी नसतो. आकाशकंदील बनवायचा, किल्ला तयार करायचा याची मुले आतुरतेने वाट पहात असतात. इच्छा असुनही घराजवळ किल्ल्यासाठी जागा व साहित्य नसल्याने या मुलांच्या आनंदावर विरजण पडू नये यासाठी सावरकर मंडळ गेली दहा वर्षे हे उपक्रम राबवीत आहे.
नावनोंदणी व अधिक माहितीसाठी भास्कर रिकामे यांच्याशी ९२७००३१४७१ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
























Join Our Whatsapp Group