पिंपरी (प्रतिनिधी) :- पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेला विशेष महत्व असते..! त्याचमुळे दुर्गा पूजेला बंगालमध्ये एकच उत्साह पहायला मिळतो. तोच उत्साह पिंपरी चिंचवडमध्येही अनुभवायला मिळाला. पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागरमध्ये मोठ्या प्रमाणात पश्चिम बंगाल मधील नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांनी आयोजित केलेल्या दुर्गापूजेला मोठी गर्दी पहायला मिळाली. यंदाचे हे सहावे वर्ष होते. विशेष म्हणजे रावणाचा वध करताना दुर्गा रावणाचे संवरक्षण करत होती तेंव्हा रामाने दुर्गा पूजा केल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे त्याला मोठी गर्दी होती.
























Join Our Whatsapp Group