पिंपरी (Pclive7.com):- चाकणला सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोनेश संजय घोगरे उर्फ मोन्या (वय-२१, रा. चाकण) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी शुभम म्हस्के, चेतन म्हस्के, चंद्रकांत कुऱ्हाडे, रोहित कुऱ्हाडे, अर्जून कुऱ्हाडे, आकाश चौधरी, किशोर धिवर, प्रणव जाधव आदींसह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनेशला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्याची तडीपारीची मुदत संपली होती. सोमवारी रात्री अमोल लाटूकर या मित्रासमवेत तो घरी जात होता. चाकण मार्केटजवळ दुचाकींवर आलेल्या १३ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात घोगरेचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे. पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.
























Join Our Whatsapp Group