पुणे (Pclive7.com):- कर्नाटकात महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ पुण्यात खेड शिवापूर टोल नाक्यावर स्वराज्य संघटनेकडून कन्नडिकांविरोधात आंदोलन करण्यात आले.

पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर स्वराज्यचे कन्नडिकांविरोधात आंदोलन करत कर्नाटकच्या गाड्यांची हवा सोडण्यात आली. स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉक्टर धनंजय जाधव यांनी म्हटलं की, कर्नाटकमध्ये केलेल्या उच्छादाला स्वराज्यचे प्रत्युत्तर आहे. आज कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो असणाऱ्या व महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी खेड शिवापूर टोल नाक्यावर स्वराज्य संघटनेच्यावतीने जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.
कर्नाटकातील वाहनांवर स्वराज्य संघटनेचे स्टिकर लावण्यात आले तसेच गाड्यांवर जय महाराष्ट्र लिहून कन्नडिकांचा निषेध नोंदविण्यात आला.
























Join Our Whatsapp Group