पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरवासीयांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला शास्तीकर माफीचा ऐतिहासिक निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनात घेतला आहे.

आमदार महेश लांडगे यांनी नागपुर येथे हिवाळी अधिवेशनात शास्तीकराचा मुद्दा मांडून तो सोडवल्याबद्दल कुदळवाडी परिसरातील नागरिक शिंदे फडणवीस सरकार व आमदार महेश लांडगे यांचे धन्यवाद करण्यासाठी दिनेश लालचंद यादव यांनी नागरिक हस्ताक्षर धन्यवाद मोहीम राबविली. सर्व शास्तीकर बाधीत नागरीकांनी एकत्र येऊन आपल्या हातानी शिंदे फडणवीस सरकार व आमदार महेश लांडगे यांचे धन्यवाद मानले.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर, कुदळवाडी यादवनगर येथे एकत्र येत पेढे वाटून, फटाके वाजवून आंनद उत्सव साजरा केला. यावेळी कुदळवाडीतील नागरिक, ग्रामस्थ उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group