पिंपरी (Pclive7.com):- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, प्रमुख पाहुणे अंजली गवळी, सोमलता तिवारी, दत्ता बनसोडे, शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेतील मुलींना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सावित्रीच्या लेकी म्हणून सन्मान करण्यात आला. राहुल चौधरी, सोनाली गायकवाड, स्वरूप शिंदे या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई यांच्याबद्दल आपल्या भाषणातून माहिती सांगितली. आराध्या घोडके या विद्यार्थिनीने ‘मी सावित्री बोलते’ ही एकांकीका सादर केली.
आम्ही सावित्रीच्या लेकी आपला हक्क मिळविण्यासाठी सतत संघर्ष करत राहू ही शिकवण सावित्रीबाईंनी आम्हाला दिलेली आहे, आणि आम्ही त्यांची शिकवणूक कधीही विसरणार नाही. आम्ही आमच्या हक्कासाठी सतत संघर्ष करत राहू.सावित्रीबाईनी स्त्रियांना जी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे त्या संधीचे आपण सोने करावे. स्त्री शिक्षणाचा पाया रचणार्या कर्तुत्वान सावित्रीबाई फुलेंचा आम्हाला अभिमान.” असे सहशिक्षिका सौ.निशा पवार यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल गवळीने केले व आभार रिया परमारने मानले.





















Join Our Whatsapp Group