पिंपरी (Pclive7.com):- नगरसेविका निर्मला कुटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिर व देवीआई माता मंदिराजवळ पवना नदीच्या घाटावर उत्तर भारतीय नागरिकांचा पावन पवित्र सण असणाऱ्या छटपूजेचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते.
नगरसेविका निर्मला कुटे यांच्या हस्ते छटपूजन करण्यात आले. नगरसेविका निर्मला कुटे यांनी उत्तर भारतीय नागरिकांना छठपूजा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी उत्तर भारतीय नागरिक मंडळाचे रमेश पांडे, घनश्याम निशाद, संतोष ओझा व उत्तर भारतीय बंधू भगिनी उपस्थित होते.