पिंपरी (Pclive7.com):- अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मंगळवार (दि.१०) रोजी अष्टविनायक दर्शनासाठी वल्ल्लभनगर आगारातून महामंडळाने नागरिकांचा प्रतिसाद पाहता ५ गाड्यांची व्यवस्था केली आहे.

यापूर्वीच्या चारही गाड्यांचे बुकिंग फुल्ल झाले असून, प्रवासांच्या सुविधेसाठी पाचव्या गाडीचे बुकिंग सुरू केले आहे. पिंपरी-चिंचवड येथील वल्लभनगर आगारामधून गाडी निघून ती शिवाजीनगर स्वारगेट, थेऊर, मोरगाव, सिध्दटेक, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री, महड, पाली येथे जाणार आहे. प्रवाशांना अष्टविनायकांचे दर्शन घेता येणार आहे.
प्रवासी भक्तांना यात्रा कालावधीत ओझर येथील भक्त निवासात मुक्काम करता येणार आहे. या ठिकाणी भोजन आणि निवासाची व्यवस्था भक्तांना स्वतःच करावी लागणार आहे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार प्रमुखांनी केले.
Tags: ५ गाड्याAstavinayak DarshanPimpri Chinchwadअंगारकी चतुर्थीअष्टविनायकअष्टविनायक दर्शनअष्टविनायक दर्शनासाठी वल्लभनगरमधून ५ गाड्यापिंपरी चिंचवडवल्लभनगर आगार





















Join Our Whatsapp Group