पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडमध्ये ६ वर्षीय चिमुकल्याला भटक्या कुत्र्याने कडाडून चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. चिमुकला जखमी झाला असून १३ टाके पडले आहेत. ही घटना आज सकाळी घडली आहे. मोहम्मद शेख (वय- ६ वर्षे) असं कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. पिंपरीतील संत तुकाराम परिसरात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरीतील संत तुकाराम नगर, शिवनेरी सोसायटी येथे घडलेल्या घटनेमुळं पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अवघ्या सहा वर्षीय मोहम्मवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला असून त्याच्या उजव्या हाताला तीन ठिकाणी चावा घेतला आहे. सुदैवाने नागरिकांनी कुत्र्याला हुसकावून लावल्याने मोहम्मदचा जीव वाचला आहे. मोहम्मदच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून १३ टाके पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
भटक्या कुत्र्याचा चावा इतका भयंकर होता की कुत्र्याने हाताचे लचके तोडले आहेत. या घटनेमुळं पिंपरी- चिंचवड शहरातील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा ऐरणीवर आला असून पालकांनी आपल्या लहान मुलांवर लक्ष द्यायला हवं. जेणेकरून अशा गंभीर आणि जीवावर बेतणाऱ्या घटना टाळता येतील.





















Join Our Whatsapp Group