प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अभियानला सुरूवात
पिंपरी (Pclive7.com):- “चांगले आरोग्य हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. सध्याची परिस्थिती पाहता दवाखान्याचा खर्च हा सर्वसामान्यांना न परवडणारा आहे. यामुळे आरोग्यासह समाजाला आरोग्य विम्याचे सुरक्षा कवच उपलब्ध करून देणे हे तितकेच महत्वाचे आहे. ही जबाबदारी स्वीकारूनच कुदळवाडीमधील नागरिकांना ‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजना – आयुष्यमान भारत’ अंतर्गत मोफत 6.50 लाखांचे आरोग्य विमा कवच अभियानाला सुरवात केल्याचे भाजयुमो सरचिटणीस तथा स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी सांगितले.

आमदार श्री महेशदादा लांडगे युवा मंच व आकुर्डी हाॅस्पीटल पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने सध्याची परिस्थिती आणि गरज ओळखून प्रधानमंत्री जनआरोग्य योजना – आयुष्यमान भारत’ अंतर्गत कुदळवाडीमधील नागरिकांसाठी आरोग्य विमा कवच काढून सर्वाना आरोग्य सेवा देण्याचा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
असा घ्या योजनेचा लाभ..
कुदळवाडीतील नागरिकांसाठी विमा योजना अभियान पुढील काही दिवस सुरु राहणार आहे. स्वतःचे आधारकार्ड, पंतप्रधान योजनेचे पत्र किंवा रेशन कार्ड, ज्यांना पत्र मिळाले नाही त्यांनी रेशनकार्ड व आधारकार्ड घेऊन आपले नाव यादीमध्ये तपासुन घ्यावे. यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वत: उपस्थित राहणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी श्री दिनेश लालचंद यादव जनसंपर्क कार्यालय कुदळवाडी बीआरटी रस्ता येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
























Join Our Whatsapp Group