पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील सात पोलीस अधिकारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना आयुक्तालयाच्या वतीने निरोप देत भावी जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

पोलीस उपनिरीक्षक संजय शंकर सरकाळे, पोलीस उपनिरीक्षक शिरीष कोंडाजी रसाळ, पोलीस उपनिरीक्षक संजय लीलाधर कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक बबन सटबाजी डोईफोडे, कार्यालय अधीक्षक देवदत्त माधवराव पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र हरिदास चौधरी, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र केशव भोसले यांचा निरोप समारंभ मंगळवारी (दि.३१) पोलीस आयुक्तांच्या दालनात झाला.
सेवानिवृत्त झालेल्या पोलिसांना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शुभेच्छा दिल्या. आपण पोलीस सेवेतून सेवानिवृत्त झालेला असाल तरी सुद्धा पोलीस विभागासाठी आणि समाजासाठी आपण कार्य करावे, असे पोलीस आयुक्त चौबे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
























Join Our Whatsapp Group