पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी येथे कामावर निघालेल्या महिलेवर एकाने कुऱ्हाडीने नऊ वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मनिषा चव्हाण (वय, ३५, रा. कासारवाडी) असे जखमी महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.
चच्हाण हिने याबाबत भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, आज सकाळी कामावर जात असताना सुभाष लांडगे याने तिच्यावर कुऱ्हाडीने वार केले.
दरम्यान, हा प्रकार प्रेम प्रकरणातून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
























Join Our Whatsapp Group