पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्याचे माजी गृह राज्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी आज भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मेंद्र सोनकर यांच्या पिंपरीतील निवासस्थानी भेट दिली. येथे त्यांनी शहरातील उत्तर भारतीय नेते मंडळींशी चर्चा केली. यावेळी त्यांनी उत्तर भारतीयांना एकजुटीत रहा असा संदेश दिला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय होईल अस विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरिता माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये तीन-चार दिवसांपासून तळ ठोकून होते. या दौऱ्याच्या वेळेस त्यांनी स्थानिक उत्तर भारतीय नेते तसेच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी सर्व आढावा घेतल्यानंतर त्यांनी सर्वांनी एकत्रितरित्या भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर कृपाशंकर सिंह यांनी भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मेंद्र सोनकर यांच्या पिंपरीतील निवासस्थानी आज भेट दिली. यावेळी उद्योगपती रतन सोनकर, सूर्यनारायण सोनकर, धरमवीर सोनकर, भाजपाचे जिल्हा महामंत्री आकाश भारती, सामाजिक कार्यकर्ता सुखलाल भारती, वीरेंद्र सोनकर, आरपीआयचे नेते सुरेश निकाळजे, वरिष्ठ नेता शैलेंद्र सिंह, मनोज सूर्यवंशी, नेताजी सिंह, माजी नगरसेवक अरुण टाक, अमित सोनकर, रितेश सोनकर, अमर सिंह, बिपिन सिंह, मनोज सिंह, अरविंद सिंह, मुकेश सिंह, करमवीर सोनकर, राजेश यादव, संदीप पवार आदी उपस्थित होते.