पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या असलेल्या आणि जुनी पेन्शन योजना लागू असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामावर राजू व्हावे. अन्यथा त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे परिपत्रक महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी काढले आहे.

या परिपत्रकात म्हटले आहे की, दिनांक १४ मार्च २०२३ पासून शासकीय व निमशासकीय सेवेतील अधिकारी कर्मचा-यांनी जुनी योजना लागू करण्यासाठी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारलेला आहे. संपामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी सहभागी झालेले आहेत. सदरचा संप हा जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत असूनही नवीन पेन्शन योजना लागू असलेले व जुनी पेन्शन योजना लागू असलेले असे संपात सहभागी असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

वास्तवित पाहता जुनी पेन्शन योजना अनुज्ञेय असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांनी या संपात सहभागी होण्याचे कुठलेही प्रयोजन नाही. महानगरपालिका अधिकारी व कर्मचा-यांनी संपामध्ये सहभागी होऊ नये याबाबत सूचना निर्गमित करूनही पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांनी राज्यव्यापी बेमुदत संपामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना वेठीस धरले गेले आहे.

…तर शिस्त भंग कारवाईस पात्र
पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचारी याना कळविण्यात येते की, जुनी पेन्शन योजना अनुज्ञेय असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांनी तात्काळ कर्तव्यावर रुजू व्हावे. संबंधित विभाग प्रमुखांनी आपल्या आस्थापनेवर कार्यरत जुन्या पेन्शन योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांना तात्काळ कर्तव्यावर रुजू होण्याबाबत निर्देश द्यावेत. तशा सूचना लेखी स्वरूपात संबंधितांना देण्यात याव्यात. उपरोक्त निर्देशांचे पालन न झाल्यास तसेच असे अधिकारी व कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम क्रमांक ६ चा भंग केल्याने शिस्त भंग कारवाईस पात्र राहतील अशी समज यापरिपत्रकान्वये सर्व संबंधितांना देण्यात येत आहे.
Tags: Government Employees StrikePcmc CommissionerPcmc newsPimpri Chinchwad Municipal CorporationShekhar Singhstrike
























Join Our Whatsapp Group