पिंपरी (Pclive7.com):- सत्यम ज्वेलर्स नवीन सुरुवात आणि गुढी पाडव्याचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी सज्ज आहे. मौल्यवान रत्नांसह काळजीपूर्वक हस्तनिर्मित केलेल्या दागिन्यांची शान, जीवनाचे सार बदलण्यात मदत करते यात शंकाच नाही.

आमचे ट्रॅडिशनल, अँटिक आणि टेम्पल दागिन्यांचे पर्याय भव्य प्रभाव निर्माण करतात आणि प्रत्येक विशेष प्रसंगी आकर्षक दिसण्यास मदत करणार आहेत.

संपूर्ण निसर्ग स्वतःला एका नवीन स्वरूपात पलटत असताना, मराठी नूतन वर्ष येण्यात वेगळाच सुंदर अनुभव आहे. नुकतीच थंडी संपून, उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते. होळीच्या सणाला सर्व अशुभ गोष्टींचे दहन करून, तसेच रंगपंचमीच्या निर्मळ पाण्यात आणि रंगांनी अवघ्या सृष्टीला रंगवून जणू चाहूल लागते आपल्या नविन वर्षाची.

आपल्या गुढीपाडव्याचे आगमन होत आहे. जय्यत तयारी करा, मराठी अस्मितेचा नवा सूर्य उगवतीच्या दिशेनं वाटचाल करतो आहे. त्याच्या पाऊलखुणा उठवण्यासाठी त्यानेच सुवर्ण किरणांच्या पायघड्या अंथरल्या आहेत. निसर्ग जणू म्हणत आहे, आता जुने ते वगळून, नवे हिरवे शालू नेसून घ्या! एक नवा ‘उत्साह’ आणि नवीन ‘सुरुवाती’चे स्वागत करण्यास सज्ज व्हा..!

नूतन वर्ष सुख, समृद्धी आणि सौन्दर्य अधिक पटीत वाढेल या करीत आम्ही, सत्यम ज्वेलर्स, तुम्हास आणि तुमच्या परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
























Join Our Whatsapp Group