पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमधील कुणाल आयकॉन रोड वरील रोझलॅन्ड सोसायटी शेजारील नवीन २० लाख लिटर पाण्याची टाकी वॉश आऊट करण्यात येणार आहे. ही प्रक्रीया पुर्ण झाल्यावर लगेचच या टाकीवरून संपूर्ण कुणाल आयकॅान रोडवरील सर्व सोसायटींना पाणी पुरवठा करण्यात येईल. त्यामुळे रहाटणी, पिंपळे सौदागर मधील पाणी समस्या लवकरच सुटेल असा विश्वास माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी व्यक्त केला.
रहाटणी, पिंपळे सौदागरमधील पाणी समस्येबाबत नाना काटे यांनी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सुर्यवंशी, उपअभियंता दिपक पाटील यांच्या समवेत संयुक्त बैठक घेतली. काही दिवसांपासून रहाटणी, पिंपळे सौदागरमध्ये कमी व अपुरा पाणी पुरवठा केला जात आहे. नागरिकांना यामुळे आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
तसेच रोझलॅन्ड शेजारील पाण्याची टाकी बांधुन पूर्ण झालेली आहे. तसेच या टाकी वरून पाणी पुरवठा करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजुस ३०० एमएम व्यासाची पाईप लाईन टाकलेली आहे. परंतु, टाकी परिसरात काही किरकोळ काम बाकी असल्याने ती चालु करण्यात आली नाही.
परंतु, ते काम आता पूर्ण झाले असुन या टाकीवरून पाणी पुरवठा केल्यास परिसरातील पाण्याची समस्या मिटेल ही बाब आयुक्त यांच्या निर्दशनास आणुन लवकरात लवकर ही पाण्याची टाकी चालु करावी अशी मागणी नाना काटे यांनी पत्राद्वारे केली होती.
त्यानुसार आज मध्यरात्री कुणाल आयकॅान रोड वरील रोझलॅन्ड सोसायटी शेजारील २० लाख लिटर पाण्याची टाकी वॉश आऊट करण्यात येणार आहे. ही प्रक्रीया पूर्ण झाल्यावर लगेचच या टाकीवरून संपुर्ण कुणाल आयकॉन रोडवरील सर्व सोसायटींना पाणी पुरवठा करण्यात येईल. त्यामुळे रहाटणी, पिंपळे सौदागर मधील पाणी प्रश्न मार्गी लागला असल्याचे नाना काटे म्हणाले.