पिंपरी (Pclive7.com):- फॅशन जगताचा अपवादात्मकपणे मांडलेला आणि भव्य असा इव्हेंट म्हणजे ‘पुणे टाइम्स फॅशन वीक’. या इव्हेंट मार्फत शैली, अभिजातता आणि ऐश्वर्य यामध्ये बदल घडवून आणणाऱ्या उत्कृष्ट घटकांचे प्रदर्शन करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या आश्चर्यकारक संख्येसह, सर्व सौंदर्य पैलू डोळ्यादेखत प्रदर्शित होणे हे अत्यंत सकारात्मक होते. समर्थन आणि प्रशंसा चार्ट वर तर होतेच, परंतु ड्रेपरी, ज्वेलरी, मेकअप आणि पूर्णतः सेटअप आकर्षकपणे सादर केले गेले.

सत्यम ज्वेलर्स हे रॉयल तस्त आणि पुणे टाइम्स फॅशन वीक साठी अभिमानास्पद ज्वेलरी पार्टनर होते. मेकअप आर्टिस्ट रोहिणी काकडे सह सत्यम ज्वेलर्सच्या कलाकुसरीला नवी झळाळी मिळाली, यात शंकाच नाही. अद्वितीय पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिन्यांच्या ठळक घटकांनी प्रदर्शन सजले होते. अशा उत्तम सादरीकारणांनी कार्यक्रमाची प्रतिष्ठा एक नव्या उंचीला नेऊन ठेवले होती.

राजेशाही थाटाची थीम, महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि पारंपारिक सार यावर दागिन्यांचे डिझाइन केंद्रित होते. अचूक कल्पनांना पूरक म्हणून, सत्यम ज्वेलर्सने अनोखे आणि सुंदर दागिन्यांचे पैलू तयार केले ज्याचे कार्यक्रमात बरेच कौतुक केले गेले.
एक गोष्ट जाणवली, की दागिन्यांचे डिझाईन हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभ्यास करून आणि कारागिरांनी विचारपूर्वकपणे केले होते. प्रत्येक मॉडेल विलक्षण दागिन्यांसह सुशोभित केलेल्या होत्या. काळजीपूर्वक डिझाइन केलेले पारंपारिक ड्रेपरी आणि खास दागिन्यांनी कार्यक्रम हायलाइट झाला यात दुमत नाही.

रॅम्पवॉक करणाऱ्या मॉडेल्स अत्यंत मोहक रचनेत सजवलेल्या होत्या, ज्यांनी आत्मविश्वास आणि नैसर्गिकपणे हे कार्य पेलवले. सत्यम ज्वेलर्सच्या दागिन्यांसह प्रत्येक मॉडेल अनोख्या दिमाखात होत्या. सर्जनशीलता, कलात्मकता आणि सौंदर्य जपत मॉडेल्स नी कार्यक्रमाची शान वाढवली. कार्यक्रमाची संपूर्ण रचना संस्मरणीय झालीच, परंतु अनेक प्रसंगी सत्यम ज्वेलर्सची कलाकृती आणि कलाकुसर अनुभवण्याचे क्षण आले.
अधिक माहितीसाठी संपर्क –
सत्यम ज्वेलर्स
कोहीनूर आर्केड,मुंबई-पुणे रोड टिळक चौक,
निगडी बसस्टॉपच्या समोर, निगडी
संपर्क क्रमांक – 8983088880
























Join Our Whatsapp Group