पिंपरी (Pclive7.com):- राज्य शासनाचा शहर सौंदर्यीकरण व नागरी प्रशासनातील विविध बाबींमध्ये उत्तम कामगिरीबद्दलचा पिंपरी चिंचवड महापालिकेचा तृतीय क्रमांकाचा रक्कम रुपये ५ कोटींचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नगर विकास दिनानिमित्त महाराष्ट्र शासनामार्फत शहर सौंदर्यीकरण व नागरी प्रशासनातील विविध बाबींमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला जाणारा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्विकारला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, मनोज सेठीया, उप आयुक्त रविकिरण घोडके, कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर, सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख आदी उपस्थित होते.
Tags: Devendra FadnavisEknath ShindePCMCPcmc newsPimpri ChinchwadPimpri Chinchwad Municipal CorporationShekhar Singh























Join Our Whatsapp Group