पिंपरी (Pclive7.com):- सांगवी आणि परिसरात घरफोड्या करणारे दोन सराईत गुन्हेगार सांगवी पोलीसांच्या जाळ्यात आले आहे. त्यांच्याकडून पोलीसांनी या परिसरातील ६ गुन्हे उघड केले असून ३ लाख ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जम्बो उर्फ रमेश काळे (वय २०) प्रितेश संगु काळा (वय ३१) दोघेही राहणार मूळ गुलबर्गा कर्नाटक येथील आहेत.
या कारवाईची माहिती देताना परिमंडळ तीनचे उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले की, जितेश कोथिंबीरे व सुनील बोकड हे पोलीस कर्मचारी २७ नोव्हेंबर रोजी गस्त घालत असताना त्यांना दोन इसम परिसरात संशयितरित्या फिरत असल्याचे आढळून आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे घरफोडीचे साहित्य सापडले. पोलिसांनी त्यांना अटक करून तपास केला असता त्यांच्याकडून सांगवी परिसरात केलेले एकूण ६ गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून १२३ ग्रॅम सोन्याचे दागिने, ८५.१०० ग्रॅम चांदीचे दागिने व एक दुचाकी (एमएच १२ एएम ३८६०) असा एकूण ३ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदगुडे, पोलीस निरीक्षक गुन्हे अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे, देवेंद्र शिंदे, पोलीस हवालदार सुनील बोकड, सुरेश खांडेकर, दिनेश देशमुख, पोलीस नाईक रोहिदास बो-हाडे, कैलास केदारी, पोलीस शिपाई अशिष डावखर, जितेश कोथिंबीरे, विनायक डोळस, सुरेश काशिद, अरुण नरळे, गणेश तरंगे, शशिकांत देवकांत, दीपक पिसे, शिमोन चांदेकर, हेमंतकुमार गुत्तीकोंडा यांनी केली आहे.
























Join Our Whatsapp Group