पिंपरी (Pclive7.com):- कुदळवाडी परिसरातील घरमालकांना भाडेकरार, भाडेकरांची माहिती देण्यासाठी मुदत द्यावी. तसेच घरमालक आणि पोलिसांची बैठक आयोजित करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन स्थानिकांच्या वतीने चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांना देण्यात आले. स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांच्या पुढाकाराने हे निवेदन देण्यात आले.

चिखली पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुदळवाडी परिसरामधील घरमालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भाडेकरांबद्दल व्यवस्थित माहिती न मिळाल्याने नागरिक संभ्रम अवस्थेत असून याबद्दलची व्यवस्थित माहिती देण्यासाठी पोलीस व घर मालक यांच्यामध्ये स्वतंत्रपणे एक बैठक आयोजित करावी. भाडेकरार याबद्दल व्यवस्थित माहिती देऊन भाडे करार बद्दल जी कागदपत्रे आवश्यक आहेत त्याची व्यवस्थित माहिती देऊन नागरिकांमधली संभ्रमता दूर करावी.

लवकरात लवकर घरमालक व पोलीस अधिकारी यांच्यात बैठक आयोजित करावी अशी मागणी सदस्य दिनेश यादव व कुदळवाडीतील ग्रामस्थ अँड नितीन मोरे, उत्तम बालघरे, काका शेळके, राहुल गवारे, प्रकाश चौधरी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
























Join Our Whatsapp Group