पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी कॉंग्रेस असंघटीत कामगार संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा श्रीमती मिनाताई मोहिते यांच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सफाई कामगारांचा नाना काटे व नगरसेविका सौ. शितलताई नाना काटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. यावेळी युवा नेते शामभाऊ जगताप, प्रशांत सपकाळ, संघटनेचे अरबाज खान,भीम थापा, नितीन गायकवाड, भूषण सपकाळ, तुकाराम कांबळे, शिवशंभो सेवा मंडळाचे सदस्य आणि विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ सभासद व सफाई कामगार उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group