पिंपरी (Pclive7.com):- ब्लड कॅन्सर सारखा मोठा आजार, दर दोन महिन्याला बदलावे लागणारे रक्त, त्यासाठीच्या प्रचंड महागड्या उपचारासाठी चक्क वयाच्या १७ व्या वर्षापासून घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार निगडी पोलीसांच्या जाळ्यात आला आहे. मुकेश उर्फ मुन्ना उर्फ धन्या उर्फ धनंजय बबन मुने वय-२१, राहणार कोथरूड पुणे असं या आरोपीचं नाव आहे.
पिंपरी चिंचवड शहरातल्या घरफोड्या रोखण्यासाठी पोलिसांनी सध्या गस्त वाढवली आहे. ही गस्त सुरू असतानाच निगडी पोलिसांनी मुकेश उर्फ धन्या उर्फ धनंजय बबन मुने या २१ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली आणि पोलिसांना धक्काच बसला. १७ व्या वर्षांपासून त्याने घरफोडी करायला सुरुवात केल्याचे त्याने सांगितले. घरफोडी आणि इतर असे तब्बल ३२ गुन्हे त्याच्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आणखी तपास केल्यावर तो घरफोड्या का करत होता हे त्याने सांगितले. त्याचे कारण ऐकून पोलिस ही चक्रावले आहेत. मुकेश उर्फ मुन्ना उर्फ धन्या उर्फ धनंजय बबन मुने याला ब्लड कॅन्सर असल्याने त्याला दर दोन महिन्याला रक्त बदलावे लागते. एवढे महागडे उपचार करण्यासाठी तो चोरी करत असल्याचे त्याने सांगितले. पोलिस आता त्याच्या या दाव्याचा तपास करत आहेत.
























Join Our Whatsapp Group