पिंपरी (Pclive7.com):- श्रीलंका येथे २६ ते ३१ ऑगस्ट २०२३ दरम्यान होणाऱ्या युथ एशियन योगा गेम्ससाठी निगडी येथील अभिश्री राजपूत यांची भारतीय संघाची कोच म्हणून निवड करण्यात आली आहे. भारतीय एशियन गेम्सचे सेक्रेटरी सुरेश गांधी सर यांनी ही निवड केली आहे.

अभिश्री या कोया फिटनेस अकॅडमीच्या संस्थापक असून त्यांच्या संघटनेतून पिंपरी चिंचवड मधील १३ मुलींची या भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामध्ये अनुष्का रानडे, आर्या जाधव, कवी गायकवाड, रुजल जोशी, आरोही राऊत, मनवा पंडित, मुक्ता जाधव, त्रिशा बंसल, ट्विषा सुहानी, सई निंबाळकर, प्रणिका गावंडे, जानवी मुळूक, अनविका वायकर या सर्वांची निवड झाली आहे.

२४ ऑगस्ट रोजी हा संघ एशियन गेम्ससाठी रवाना होईल. या सर्वांना भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या व अभिश्री यांचा सन्मान करण्यात आला.






















Join Our Whatsapp Group