पिंपरी (Pclive7.com):- नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आज पिंपळे सौदागर मधील विसर्जन घाटाची पाहणी केली. तसेच विसर्जन घाटावर केलेल्या उपाययोजना यांचा आढावा घेतला.

पिंपळे सौदागर येथील देवीआई माता व दत्त मंदिर विसर्जन घाट गणपती बापाच्या विसर्जनासाठी सज्ज झाले आहे. आजपासून बरेचसे गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी घाटावर येण्यास सुरुवात झाली आहे. दीड दिवसाच्या आपल्या गणपती बापाला निरोप देऊन पुढच्या वर्षी लवकर ये असा जयघोष करत बाप्पाला निरोप देत आहेत. यावेळी विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आले आहेत. तसेच नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी हे गणेश भक्तांना विसर्जन घाटावर कसलाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी तसेच आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी घाटावर उपस्थित आहेत.
घरगुती गणेशमूर्तींच्या संकलनासाठी विसर्जन घाटावर पालिकेमार्फत मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली आहे. घाटावर विद्युत रोषणाई करण्यात आले असून विसर्जन वेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून देखरेख करण्यासाठी CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहे. सार्वजनिक तसेच घरगुती बाप्पांना महापालिकेने आखून दिलेल्या नियमांनुसार संकलित केलेल्या मूर्त्यांचे विसर्जन करण्यात येणार आहे. मूर्तीची कुठल्याही प्रकारची विटंबना होणार नाही याबाबत काळजी घेण्याच्या सूचना नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी संबंधितांना केल्या आहेत.
मोठ्या संख्येने गणेशभक्तांनी मूर्तींचे विधिवत पूजन करून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे मूर्ती सुपूर्द करावे असे आवाहन देखील नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी गणेश भक्तांना व गणेश मंडळांना केले आहे. विसर्जन घाटावर बापाच्या विसर्जनाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी गणेश भक्तांना सुरक्षितपणे, खबरदारी घेत बाप्पाचे विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून विसर्जन दरम्यान घडणारे अपघात टाळता येईल आणि बाप्पाला निर्विघ्नपणे निरोप देता येईल.























Join Our Whatsapp Group