पिंपरी (Pclive7.com):- मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने सांगवी, पिंपळे गुरव परीसरात डेंग्यू आजाराबाबत गणेश मंडळाच्या आरतीच्या वेळी संध्याकाळी सात ते नऊ वेळात दररोज तीन मंडळामध्ये स्पीकर द्वारे, माहितीपत्रक वाटून डेंग्यू आजाराची जनजागृती करण्यात येत आहे. डेंग्यू आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी आणि झाल्यावर त्यावरील उपाय योजनांची माहिती स्वतः शहराध्यक्ष आण्णा जोगदंड हे स्पीकरमधून गणेश भक्तांना देत होते. ही जनजागृती सहा दिवसापर्यंत चालणार असल्याचे जोगदंड यांनी सांगितले.

सध्या पिंपरी चिंचवडमध्ये १२५ डेंग्यू आजाराचे रूग्ण असून आयुक्त शेखर सिंह यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत जनजागृती करत असल्याचे जोगदंड यांनी सांगितले.
डेंग्यू आजार म्हणजे डंक छोटा, धोका मोठा, त्यामुळे हिवताप, डोकेदुखी, अंगावर लालसर रंग येणे, तीव्र पाठ दुखी, पुरळ उठणे असे लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आव्हान करण्यात आले. महापालिकेच्या ‘ह’ प्रभागाच्या आरोग्य निरीक्षक धनश्री जगदाळे यांनी डेंग्यू आजाराची मंडळासमोर माहिती देऊन उपाययोजना हि सांगितल्या. तसेच आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. नागरिकांनी आपआपला परिसर स्वच्छ ठेवणे तसेच पाणी न साठण्याची खबरदारी घ्यावी, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस साजरा करावा असा सल्ला यावेळी देण्यात आला. तसेच प्लास्टिक मुक्तीची शपथ उपस्थित गणेशभक्तांना जोगदंड देत आहेत.
या जनजागृती मोहिमेत शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, महिला अध्यक्षा मिना करंजावणे, मुरलीधर दळवी, गजानन धाराशिवकर, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ह प्रभागाच्या आरोग्य निरीक्षक धनश्री जगदाळे, महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष मनिष भापकर, उपाध्यक्ष दिपक गायकवाड, कार्याध्यक्ष विनायक गारवे, खजिनदार विजय साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश सकट, सत्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष सौरभ शिंदे, राम डुकरे, लिना रानडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group