पिंपरी (Pclive7.com):- गणेश विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा अश्या सूचना नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी महापालिका प्रशासनसोबत पिंपळे सौदागर येथील देवी आई माता व दत्त मंदिर विसर्जन घाटाची पाहणी केली. यावेळी विसर्जन घाट या ठिकाणी केलेल्या उपाययोजना यांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी प्रशासनासोबत विसर्जन घाटावर गणपती बापाच्या विसर्जनासाठी बनविण्यात आलेल्या कुत्रीम हौदाची पाहणी केली. तसेच गणपती मूर्ती संकलनासाठी केलेल्या उपाययोजनाचा आढावा घेतला. गणेश भक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिले आहेत.
पिंपळे सौदागर येथील देवी आई माता व दत्त मंदिर विसर्जन घाट याठिकाणी गणपती याठिकाणी गणपती बाप्पांच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे. नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त, महापालिका प्रशासन सकाळ पासूनच घाटावर उपस्थित आहेत. आणि विसर्जन दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये याबाबत दक्षता घेत आहेत.
आज पिंपळे सौदागर रहाटणी परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळे, घरगुती घरातील गणपती यांचे विसर्जन अति उत्साहात पार पडत आहे. यावेळी पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, सहाय्यक आयुक्त आरोग्य यशवंत डांगे, कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, स्थापत्य उपअभियंता सुनील नरोटे, ‘ड’ प्रभाग अधिकारी किरण कुमार मोरे, सहाय्य आरोग्य अधिकारी महेश आढाव, कनिष्ठ अभियंता प्राजक्ता गव्हाणे मॅडम, आरोग्य निरीक्षक प्रणय चव्हाण आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Tags: अतिरिक्त आयुक्तगणेश विसर्जन घाटपिंपरी चिंचवड महापालिकापिंपळे सौदागररहाटणी - पिंपळे सौदागरविजयकुमार खोराटेशत्रुघ्न काटे























Join Our Whatsapp Group