पिंपरी (Pclive7.com):- आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गणेश मंडळांच्या भेटी घेतल्या. मात्र या सर्वांमध्ये महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांचा झंझावात पाहायला मिळाला. चिखले यांनी शहरातील सर्वाधिक म्हणजेच तब्बल ३२८ गणेश मंडळांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत.

सालाबाद प्रमाणे यावर्षीही गणपतीचे आगमन मोठ्या जल्लोषात पिंपरी चिंचवड शहरामध्ये करण्यात आले. अनेक मंडळांनी समाजासमोर असणारे विविध समस्या व त्याचप्रमाणे ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक असे देखावे सादर केले होते. सर्व मंडळांनी समाजप्रबोधनाचे काम मोठ्या प्रमाणात केले. यावर्षी शहरातील विविध भागांमध्ये, निगडी, पिंपरी, दापोडी, भोसरी, सांगवी, रावेत, किवळे, पुनावळे, बोपखेल, अशा सर्व गणेश मंडळांनी सचिन चिखले यांना आरतीचा मान दिला. यावर्षी त्यांनी तब्बल ३२८ गणेश मंडळांना भेटी दिल्या.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गणेश मंडळांना भेटी दिल्या. मात्र सामान्य जनतेचा आवाज असल्येल्या सचिन चिखले यांनी सर्वाधिक ३२८ गणेश मंडळांना भेट दिली. गेली दहा दिवस ते पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे शहरातील पिंपरी विधानसभा चिंचवड विधानसभा तसेच भोसरी विधानसभेतील गणेश मंडळांना जाऊन भेट देत होते यावेळी मंडळातील सदस्य कार्यकर्ते जेष्ठ नागरिक यांच्याशी दिलखुलासपणे चर्चा देखील करत होते. सचिन चिखले यांच्या गणेश मंडळांच्या गाठीभेटीमुळे फक्त त्यांचाच झंझावात पाहायला मिळाला.





















Join Our Whatsapp Group