पिंपळे सौदागर मध्ये ज्येष्ठ नागरिक संघाचा १४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
पिंपरी (Pclive7.com):- जेष्ठ नागरिक संघ, पिंपळे सौदागर यांचा चौदावा वर्धापन दिन बासुरी बँक्वेट हॉल, हॉटेल गोविंद गार्डन पिंपळे सौदागर याठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक शत्रुघ्न काटे होते. या वर्धापन सोहळ्याप्रसंगी जेष्ठ महिला व नागरिकांसाठी हिंदी, मराठी सुश्राव्य गाण्यांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले कि, आज उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी या वर्धापन सोहळ्यानिमित्ताने आयोजित या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुण पिढीला लाजवेल अशी त्यांच्यामध्ये सामावलेली ऊर्जा आणि उत्साह दाखवून दिली आहे. वय हा फक्त एक आकडा असतो, त्याचा आपल्या उत्साह, आत्मविश्वास यावर कुठलाही प्रभाव नसतो. उभ्या संपूर्ण आयुष्यात सर्व जबाबदारी चोखपणे पार पाडून जेव्हा आपण निवृत्त होतो तेव्हा बहुसंख्य नागरिक एकाकी जीवन जगत असतात. सहकारी दूर झालेले असतात, अश्या वेळी नवे सहकारी मिळावेत, सवंगडी मिळावेत व आयुष्याच्या या टप्प्यात आपला उर्वरित वेळ समाधानी व आनंदी जावे. तसेच एकमेकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी अश्या जेष्ठ नागरिक संघाचे योगदान मोलाचे ठरते.
यावेळी जेष्ठ नागरिक महासंघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष्या श्रीमती वृषाल मरळ, पिंपळे सौदागर जेष्ठ नागरिक संघ अध्यक्ष श्री भागवत झोपे, उपाध्यक्ष श्रीमती शोभा काळे, सचिव श्री दिपक मारावर, कार्याध्यक्ष श्री विलास नगरकर, कोषाध्यक्ष श्री प्रकाश काळे, श्री विलास जोशी व जेष्ठ नागरिक संघातली सर्व सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group