पिंपरी (Pclive7.com):- पुणे- मुंबई एक्सप्रेसवेवर आज (दि.१२) पुन्हा एक तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने उर्से टोलनाका येथे थांबविण्यात येणार असून अवजड वाहतूक वगळता इतर वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अस आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे. मंगळवारी देखील ओव्हर हेड ग्रॅंटी उभारण्यात आली होती. तेव्हा, दोन तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता.

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर पुन् हा एकदा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मंगळवारी देखील मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या महामार्गावर दोन तासाचा ब्लॉग घेण्यात आला होता. आता मुंबईच्या लेनवर बोरघाटात किलोमीटर ४५/६०० आणि किलोमीटर ४१/५०० या ठिकाणी ओव्हर ग्रॅंटी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी दुपारी १२ ते ०१ च्या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळेत उर्से टोल नाका येथे अवजड वाहतून थांबविण्यात येणार आहे. इतर वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर कराव असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.
























Join Our Whatsapp Group