नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार; नागरिकांनी व्यक्त केला विश्वास
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर भाजपाच्या वतीने ‘महाविजय २०२४’ अंतर्गत ‘घर चलो’ अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. हे अभियान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पिंपरी येथील शगुन चौक, साई चौक, राधिका चौक येथील नागरिकांशी संवाद साधला. या अभियानाला परिसरातील नागरिकांनी देखील उत्सफूर्त प्रतिसाद दिला. येणाऱ्या निवडणुकीत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

या अभियानाचे संयोजन पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले होते. याप्रसंगी भोसरीचे आमदार महेश लांडगे, चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, भाजप प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, राजेश पांडे, संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आमदार प्रशांत ठाकूर, प्रभारी वर्षा डहाळे, मावळ लोकसभा संयोजक सदाशिव खाडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माऊली थोरात, दक्षिण भारतीय प्रकोष्ठ संयोजक राजेश पिल्ले, प्रदेशाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा गणेश भेगडे, भाजयुमो प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, पिंपरी विधानसभेचे प्रमुख अमित गोरखे, चिंचवड विधानसभा प्रमुख काळूराम बारणे, भोसरी विधानसभा प्रमुख विकास डोळस, जिल्हा सरचिटणीस नामदेव ढाके, विलास मडेगिरी, शीतल शिंदे, अजय पाताडे, संजय मंगोडीकर, शैला मोळक, भाजयुमो शहराध्यक्ष तुषार हिंगे, महिला मोर्चा शहराध्यक्षा सुजाता पालांडे, रवींद्र भेगडे तसेच भाजपा सर्व माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, पेजप्रमुख, युवा वॉरियर्स आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group