आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्याकडून कविता दळवी यांचे कौतुक
चिंचवड (Pclive7.com):- कविता पंढरीनाथ दळवी यांच्या संकल्पेतुन भव्य गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली होती. दळवी नगर, इंदिरानगर, प्रेमलोकपार्क, गिरीराज पार्क, बिजलीनगर, शिवनगरी, चिंचवडे नगर, वाल्हेकरवाडी यासह प्रभाग क्रमांक १७ मधील एक हजारहून अधिक कुटुंबानी सहभाग नोंदवत मोठा प्रतिसाद दिला. स्पर्धेतील विजेत्यांना रविवारी शुभम गार्डन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी आमदार अश्विनीताई जगताप, आमदार उमाताई खापरे, शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप यांनी कविता दळवी यांच्या आयोजनाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

गौरी सजावट स्पर्धेत इंदू झोळ यांना प्रथम, संतोषी सायकर यांना दुसरे तर निशा कदलगावकर यांना तिसरे पारितोषिक मिळाले. गणपती स्पर्धेत सविता टकले यांना प्रथम, संगीता धिंमते यांना दुसरे व रोहिणी लोखंडे यांना तिसरे पारितोषिक मिळाले. यावेळी आयर्नमॅन स्वप्नील चिंचवडे व क्रिकेटपटू यश जगदाळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच आदर्श नऊ नारीशक्तींचा सन्मान देखील आयोजित केला होता. यामध्ये आदर्श डॉक्टर सपना निकाजू, आदर्श पोलीस मनिषा कांबळे, आदर्श सफाई कामगार जमुला लखन, आदर्श वकील सोनाली सारस्वत, आदर्श आई सुभद्राताई ढोरे, आदर्श कीर्तनकार माई सपकाळ, आदर्श समाजसेवक संस्कृती गोडसे, आदर्श शिक्षक भावना चव्हाण व आदर्श सेवक पल्लवी मारकड यांना गौरविण्यात आले.

यावेळी नामदेव ढाके, प.पु.श्री पुंडलिक महाराज गरुड (श्री दत्तात्रेय कानिफनाथ सेवा ट्रस्ट) श्री क्षेत्र इंदोरी, शामराव वाल्हेकर, काळूराम बारणे, शेखर चिंचवडे, निलेश भोंडवे, तात्या आहेर, सचिन शिवले, राजेंद्र चिंचवडे, विनोद मालू,भारत दळवी, राजेंद्र दळवी, सचिन दळवी, विजय दळवी, संतोष दळवी, नितीन दळवी, अविनाश दळवी, किरण दळवी, अथर्व दळवी, पल्लवी वाल्हेकर, पल्लवी मारकड, मनीषा चिंचवडे, नीलम चिंचवडे, अमृता नवले, मंदा आव्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते,तर आर जे अक्षय यांनी व लावणी कलाकार हिंदवी पाटील यांनी कार्यक्रमात मोठी रंगल आणली. कर्यक्रमाचे स्वागत कविता दळवी, व आभार अनिकेत दळवी यांनी केले.





















Join Our Whatsapp Group