पिंपरी (Pclive7.com):- आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला पिंपरी चिंचवड मधून पाठिंबा देण्यासाठी सुमारे पाचशे बाईकची रॅली काढण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष तुषार कामठे यांनी पिंपरी वाघेरे येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून बाईक रॅलीला सुरवात केली.

त्यानंतर ही रॅली पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पुढे दापोडीवरून लाल महाल येथे गेली. तिथे रॅली युवा संघर्ष यात्रेला जाऊन सामील झाली. यावेळी सुलक्षणा धर, गणेश भोंडवे, देवेंद्र तायडे, राजन नायर, काशिनाथ जगताप, मुख्य प्रवक्ते माधव पाटील, राहुल आहेर, पोपट पडवळ, योगेश सोनावणे, सुदाम शिंदे, ऍड. संतोष शिंदे, अनिल भोसले, संदीप चव्हाण आदी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group