मावळ (Pclive7.com):- श्री विठ्ठल परिवार मावळ व आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने नवीन वर्षात कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कामशेत येथे सोमवार १ जानेवारी २०२४ पासून कीर्तन महोत्सव सुरु होणार असल्याची माहिती कीर्तन महोत्सव समिती अध्यक्ष दिलीप महाराज खेंगरे, श्री विठ्ठल परिवार अध्यक्ष गणेश महाराज जांभळे, विठ्ठल नाम जप समिती प्रमुख नितीन महाराज काकडे आदींनी दिली.
आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील सर्वात मोठ्या कीर्तन महोत्सवाचे दरवर्षी आयोजन केले जाते. किर्तन महोत्सवाचे यंदा सहावे वर्ष असून कामशेत येथे साजऱ्या होणाऱ्या भव्य कीर्तन महोत्सवात यावर्षीही महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची दररोज सायंकाळी सहा वाजता सुश्राव्य कीर्तने होणार आहेत. मावळातील कानाकोपऱ्यातून विशेषत: ग्रामीण भागातून भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहत असतात.या कार्यक्रमासाठी कामशेत येथील मैदानात भव्य मंडप पार्कींग व्यवस्थेसह उभारण्यात आला आहे.
सोमवार १ जानेवारीला एकनाथ महाराज चत्तर, मंगळवार २ जानेवारीला विशाल महाराज खोले, बुधवार ३ जानेवारीला बाळू महाराज गिरगावकर, गुरुवार ४ जानेवारीला योगीराज महाराज गोसावी तसेच कार्यक्रमाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवार ५ जानेवारीला अक्रूर महाराज साखरे यांचे सकाळी दहा ते बारा यावेळेत काल्याचे किर्तन संपन्न होणार आहे.या कार्यक्रमात सहभागी होऊन किर्तन श्रवणाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.


























Join Our Whatsapp Group