मुंबई (Pclive7.com):- राज्याच्या राजकारणात आजचा दिवस सर्वात महत्त्वाचा आणि नाट्यमय ठरला आहे. राज्याच्या सत्तानाट्याचा निवाडा आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलाय. शिवेसना आमदार अपात्रता प्रकरणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. भरत गोगावलेंचा व्हीप योग्य असल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
गेल्या ८ ते १० महिन्यांपासून राज्यात चर्चेत असणाऱ्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील निकालाची अवघ्या राज्याला प्रतीक्षा होती. या निकालावरून शिंदे गट व ठाकरे गट या शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये गेल्या ८ महिन्यांत राजकीय सुंदोपसुंदी पराकोटीला पोहोचली होती.


























Join Our Whatsapp Group