पिंपरी (Pclive7.com):- बेरोजगार युवकांनी विविध रोजगारासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात केल्यास रोजगाराच्या अमर्याद संधी उपलब्ध होतील, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी केले.
पिंपरी प्रभागातील नगरसेवक संदीप वाघेरे व संदीप वाघेरे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याचे उदघाटन राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते आझम पानसरे व आयोजक नगरसेवक संदीप वाघेरे, नगरसेवक माऊली थोरात, माजी स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्याला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी बोलताना खासदार साबळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवक स्वावलंबी व उद्योजक व्हावा यासाठी कौशल्य विकास योजना सुरू केली आहे. ही योजना सर्व देशभर राबविण्यात येत आहे. युवकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व आपल्यातील कौशल्याचा विकास करून रोजगाराभिमुख बनावे. रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आपल्या या कौशल्याला संधी उपलब्ध होते त्या संधीचा लाभ जास्तीत जास्त युवकांनी घ्यावा असे आवाहनही खासदार साबळे यांनी केले.
























Join Our Whatsapp Group