पिंपरी (Pclive7.com):- इंडस्ट्रियल स्पोर्ट्स असोसिएशन ट्रस्टच्या वतीने औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी रविवार दि.३ मार्च रोजी इंडस्ट्रियल मॅरेथाॅनचे आयोजन करण्यात आले आहे. ही इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या निरोगी आरोग्यशैली जपण्याच्या उद्देशाने होत आहे.
इंडस्ट्री सेक्टर हीच कर्मभूमी असणाऱ्या कुटुंबातील प्रत्येकासाठी ही स्पर्धा म्हणजे उत्तम आरोग्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्याची सुवर्ण संधी आहे. म्हणूनच येत्या रविवारी,दि.३ मार्च रोजी सकाळी ५.३० वा.पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन ऍन्ड कनवेनशन सेंटर, मोशी येथे आपल्या इंडस्ट्री मधील सहकार्यांसोबत आणि आपल्या कुटुंबियांसोबत मोठ्या संख्येने या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे.
ही स्पर्धा स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी असून २१ किमी, १०किमी आणि ५ किमी अशा यात विविध श्रेणी आहेत. पुणे आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक प्रतिष्ठित कंपन्या या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत.


























Join Our Whatsapp Group