पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका वैद्यकिय विभाग यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेचे आकुर्डी विठ्ठलवाडी येथील दिवंगत नगरसेवक जावेद शेख स्मृती प्रतिष्ठान या कार्यालयात नियोजन करण्यात आले होते. त्यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून आला. यात सुमारे २२३ बालकांना लसीकरण करण्यात आले.
आज सकाळी ०८ ते ०५ यावेळेत आयोजित अभियानात आकुर्डी मनपा हॉस्पिटलचे डॉ. बाळासाहेब होडगर, डॉ. दीपक चौधरी, सिस्टर सरला पैठने व लता जगताप व विकास क्षीरसागर यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी प्रत्येक बालकाला चॉकलेट वाटप करण्यात आले.
या अभियानाचे नियोजन इखलास सय्यद, तौहीद शेख, प्रकाश परदेशी व शाहरुख शेख, अभिजीत पाटील यांनी केले. तर अभियानाला माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी व उद्योजक बबनराव मारणे यांनी भेट दिली. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक अण्णा कुरहाडे, अण्णा भोसले, ज्ञानेश्वर ननावरे, गौतम बेंद्रे, वसंत सोनार, यशवंत भालेराव, गोविंद राजेशिर्के, सतीश सिलंम आणि चंद्रकांत इंगळे इतर उपस्थित होते.