पिंपरी (Pclive7.com):- शहरात काळ्या काचांच्या वाहनचालकांवर पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाच्या पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. सात दिवसांत तब्बल ३४३५ वाहनांवर कारवाई करत ३७ लाख ९१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड वाहतुक शाखेतर्फे दि.२९ मार्च ते ०४ एप्रिल या सात दिवसांच्या कालावधीत काळी काच लावणाऱ्या वाहनचालकांविरोधात ही विशेष मोहीम राबवण्यात आली असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच गुन्हेगारीस आळा घालण्याकरिता पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चारचाकी वाहनास काळी काच लावणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात दि.२९ मार्च ते ०४ एप्रिल दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात आली. यात चारचाकी वाहनांस काळी काच (टेन्टेड ग्लास) लावलेल्या एकुण ३४३५ वाहनांवर वाहतुक विभागांमार्फत कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ३७ लाख ९१ हजार ५०० रुपये एवढा दंड आकारण्यात आलेला आहे.
दरम्यान, यापुढे देखील अशाच प्रकारे वेगवगळ्या हेडखाली वाहतुक शाखेमार्फत विशेष मोहिम राबवून कारवाई करण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन त्यांच्यावर होणारी दंडात्मक तसेच न्यायालयीन कार्यवाही टाळावी असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.
Tags: काळ्या काचांच्या वाहनचालकांवर कारवाईदंडात्मक कारवाईपिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड पोलीसवाहतूक पोलिसांची मोठी कारवाई























Join Our Whatsapp Group