पिंपरी (Pclive7.com):- हिंदू जननायक तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि.१४ जून २०२४) रोजी शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. महाराष्ट्र विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सदैव महाराष्ट्राच्या विकासासाठी आग्रही असणाऱ्या महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याचा म्हणजेच हिंदू जननायक राज ठाकरे यांच्या जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्राभर मोठ्या उत्साहाने पार पाडला जात. याच धर्तीवर पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संपूर्ण शहरभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
मनसे पिंपरी चिंचवड उपशहराध्यक्ष बाळा दानवले व चिंचवड विधानसभा अध्यक्ष मयूर चिंचवडे यांच्या वतीने संत मोनीबाबा अनाथ आश्रम बिजलीनगर चिंचवड या ठिकाणी मिठाईवाटप, अन्नदान, फळ वाटप बिस्किट वाटप तसेच केक कापण्याचा कार्यक्रम करण्यात आले. जयसिंग भाट भोसरी विधानसभा संघटक यांच्यावतीने दादा महाराज नाटेकर मोरया ट्रस्ट वृद्धाश्रम छात्रालय चिखली येथे लहान मुलांच्या हस्ते केक कापण्यात आला. तसेच मुलांना फळे व शालेय साहित्य बिस्कीटचे पुडे देण्यात आले.
या कार्यक्रमाला राज्याचे विद्यार्थी सेना उपाध्यक्ष हेमंत डांगे, उपशहराध्यक्ष बाळा दानवले, सचिव रुपेश पटेकर, चिंचवड विधानसभा अध्यक्ष मयूर चिंचवडे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष दत्ता देवतारासे, महिला सेना अध्यक्ष सीमा बेलापूरकर, उपशहर अध्यक्ष महिला अनिता पांचाळ, विभाग अध्यक्ष चिंचवड विधानसभा वैशाली बोत्रे, संघटक भोसरी विधानसभा जयसिंग भाट, उपविभाग अध्यक्ष पिंपरी विधानसभा नाथा शिंदे, उपविभाग अध्यक्ष पिंपरी नितीन चव्हाण, हर्षल गावडे, मयूर गवळी, दीपक बडेकर, अक्षय पारखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी, बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शहरातील तीनही विधानसभा मिळून मोठा कार्यक्रमाचे नियोजन केलेले असून पूर्ण शहरात वृक्षारोपणाचाही कार्यक्रमाचे नियोजन असल्याची माहिती मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली.