देहू (Pclive7.com):- देहूगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी मयूर शिवशरण, तर पाणीपुरवठा सभापतीपदी सुधीर काळोखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी देहूच्या नगराध्यक्ष पूजा दिवटे, बांधकाम सभापती योगेश परंडवाल, महिला बालकल्याण सभापती पूजा काळोखे, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, प्रशासन अधिकारी उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी सुधीर काळोखे यांनी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ते पद रिक्त होते. सुधीर काळोखे यांनी पाणीपुरवठा विभाग उत्तम सांभाळल्यामुळे उन्हाळ्यातही पाण्याविना नागरिकांचे हाल झाले नाहीत. उपनगराध्यक्ष पदासह पाणीपुरवठा सभापतीपद ही रिक्त होते. या पदांसाठी बुधवारी विशेष सभा होऊन उपनगराध्यक्षाची निवड करण्यात आली. मयूर शिवशरण हे उपनगराध्यक्षपदी, तर सुधीर काळोखे हे पाणीपुरवठा सभापतीपदी निवडले गेले आहेत.
दरम्यान तांत्रिक कारणास्तव सुधीर काळोखे यांचा अर्ज रद्द करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.