चिंचवड विधानसभा मतदारसंघात १२०० हून अधिक जणांनी केले रक्तदान; प्रत्येक रक्तदात्याला मिळाले ६ लाखांचे सुरक्षा कवच
चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघात स्वातंत्र्य दिनानिमित्त राहुल कलाटे फाउंडेशनच्या वतीने ‘रक्तदान महायज्ञ’चे आयोजन करण्यात आले होते. या भव्य रक्तदान शिबिरात १२०० हून अधिक जणांनी रक्तदान करत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला ६ लाखांचे सुरक्षा कवच देखील देण्यात आले आहे. राहुल कलाटे यांनी राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व मतदारसंघात कौतुक होत आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात राहुल कलाटे फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘रक्तदान महायज्ञ’चे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड मतदार संघात विविध ठिकाणी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच सर्वत्र रक्तदात्यांनी गर्दी केली होती. या रक्तदान शिबिराला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

यावेळी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास ३ लाखांचा अपघाती विमा आणि ३ लाखांचा जीवन विमा देण्यात काढून देण्यात आला आहे. तसेच प्रत्येक रक्तदात्यास आजीवन मोफत रक्त देण्यात येणार असून रक्तदात्याच्या नातेवाईकास एक वर्ष मोफत रक्त देखील दिले जाणार आहे.
राहुल कलाटे म्हणाले की, जगातील सर्वोत्कृष्ट दान म्हणजे रक्तदान होय. रक्तदान केल्याने अनेकांचे प्राण वाचवले जाऊ शकतात. रक्तदान केल्याने आपण एका बाजूला व्यक्तीचा जीव ही वाचवतो आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला एक आत्मिक समाधान ही मिळते. काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते रक्तदान केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे, रक्तदान करण्यासाठी सर्वांनी पुढे यायला हवे. राहुल कलाटे फाउंडेशनच्या हाकेला नागरिकांची उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. या शिबिरात मोठ्या संख्येने चिंचवडवासियांनी रक्तदान करून स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो.

























Join Our Whatsapp Group