चिंचवड (Pclive7.com):- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने चिंचवड विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काळेवाडी व रहाटणी फाटा येथील मजूर अड्ड्यांवर बांधकाम मजूर, कामगार, ठेकेदार यांना मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी बांधकाम मजूर, कामगार, ठेकेदार यांनी मतदानाची शपथ घेतली.
यावेळी या चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी राजीव घुले, स्वीप कक्षाचे गणेश लिंगडे, अंकुश गायकवाड, प्रिन्स सिंह उपस्थित होते.
स्वीप पथकाने उपस्थित कामगारांच्या मतदान करतेवेळी येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांच्या शंकांचे निरसन करुन कामगारांना मतदानाचे महत्व पटवून दिले.
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त जागरूक नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने चिंचवड विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील स्वीप टीमच्या वतीने ठिकठिकाणी विविध उपक्रमांद्वारे मतदान जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून या कार्यक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जात आहे.
























Join Our Whatsapp Group