पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अधिकृत उमेदवारी माजी नगरसेविका डॉ.सुलक्षणा शिलवंत धर यांना जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिलवंत यांच्या समर्थकांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी जल्लोष करत जोरदार घोषणाबाजी केली.

पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुलक्षणा शिलवंत यांची उमेदवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली. पक्षाकडून सुलक्षणा शिलवंत यांना एबी फॉर्म देखील देण्यात आला आहे.
सुलक्षणा शिलवंत यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला. पिंपरीत राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुलक्षणा शिलवंत यांच्यात थेट लढत होणार आहे.
























Join Our Whatsapp Group