पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवडच्या घर चलो अभियानाची उत्साहात सुरूवात झाली आहे. सांगवी काळेवाडी मंडल भाजपाच्या वतीने घर चलो अभियानाचे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनखाली भाजपाचे जेष्ठ नेते वसंत भावे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सांगवी काळेवाडी मंडलाचे अध्यक्ष प्रमोद ताम्हणकर, भाजपा शहर प्रवक्ते अमोल थोरात, नगरसेवक चंद्रकांत नखाते, चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष वसंत भावे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेवक अमरनाथ कांबळे, नगरसेविका सविता खुळे, निर्मला कुटे, राज तापकीर, शुभम नखाते, संकेत कुटे, श्रीराम कुटे, सिमा चौगुले, चंदा लोखंडे, माधवी राजपुरे, आदिती निकम, माधव मनोरे, राजू लोखंडे, भाजपचे कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक संघ व स्थानिक नागरिक आदि उपस्थित होते.
भाजपा नगरसेवक व पक्ष पदाधिकारी यांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन केंद्र, राज्य व मनपा यांच्या विकासभिमुख योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी भाजपा शहर प्रवक्ते अमोल थोरात म्हणाले, प्रत्येक प्रभागातील नगरसेवक व पक्ष पदाधिकारी यांचे गट तयार करून आम्ही नागरिकांना जस्तीत जास्त लाभ कसा मिळेल अशी महिती नागरिकांना देत आहेत. तसेच अभियनाच्या दरम्यान एका दिवशी स्वच्छता कार्यक्रम अभिनव पध्दतीने राबवून जाहिर नागरिकामध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करत आहोत. घर चलो अभियनाचे माध्यमातून शहरामधील नागरिकांच्या समस्या दूर करत आहोत.
भाजपचा येत्या ६ एप्रिलला वर्धापनदिन होणार आहे. तसेच भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन ६ एप्रिल रोजी मुंबई बांद्रा-कुर्ला कॉम्पेक्स (बीकेसी) येथे होणार आहे. पिंपरी चिंचवड मधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते घेऊन जाण्याचे शहर पदाधिका-यांना उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती भाजप पिंपरी चिंचवड शहर प्रवक्ते अमोल थोरात यांनी दिली.























Join Our Whatsapp Group