पिंपरी (Pclive7.com):- रेल्वे लोकलखाली सापडून एका माजी पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.०१) रोजी चिंचवड येथे घडली. निगुंडा माधुराया तेल्लाव (वय ६२, रा.त्रिवेणीनगर, निगडी) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
चिंचवड रेल्वे चौकीचे पोलिस हवालदार अनिल बागुल यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी बारा वाजताच्या सुमारास शिवाजीनगर ते लोणावळा लोकलखाली सापडून निगुंडा हे गंभीर जखमी झाले. त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. निगुंडा हे चार वर्षापूर्वी लोहमार्ग पोलिस दलातून निवृत्त झाले होते. हा अपघात कसा झाला याबाबत लोहमार्ग पोलिस चौकशी करीत आहेत.























Join Our Whatsapp Group