चिंचवड (Pclive7.com):- दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळेच वाकड परिसराचा सर्वांगीण विकास झाला आहे. त्यामुळे त्यांच्या विकासाचा वारसा पुढे चालवणाऱ्या शंकर जगताप यांनाच आमचा पाठिंबा आहे. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही महायुतीलाच भरघोस मतदान करू असा विश्वास कस्पटे वस्ती परिसरातील मतदारांनी आमदार अश्विनी जगताप यांना दिला.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाई (आठवले) – मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आमदार अश्विनी जगताप यांनी वाकड कस्पटे वस्ती येथील मतदारांची ‘डोअर टू डोअर’ भेट घेत संवाद साधला. यावेळी त्यांनी परिसरातील ग्रीन व्हॅली सोसायटी, निसर्ग पूजा, फ्लोरेन्सिया अपार्टमेंट आदी सोसायटींना भेट दिली.
यावेळी आमदार अश्विनी जगताप यांच्यासोबत स्थायी समितीच्या माजी सभापती ममताताई गायकवाड, युवा नेते गणेश कस्पटे, सारिका गणेश कस्पटे, स्नेहा रणजित कलाटे, मोनिका कस्पटे, कल्पना कस्पटे, विजया कस्पटे, सुनंदा कस्पटे, लता कस्पटे, दीपाली कस्पटे, सुवर्णा कस्पटे, माधुरी कस्पटे, छाया कस्पटे, सारिका संतोष कस्पटे, आरती कस्पटे, चैत्राली कस्पटे, सुजाता कस्पटे, शीतल कस्पटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

या दौऱ्यात मतदारांशी संवाद साधताना आमदार अश्विनी जगताप यांनी स्व. आमदार लक्ष्मणभाऊंच्या माध्यमातून चिंचवड मतदार संघाचा कसा विकास झाला, किती महत्त्वपूर्ण प्रकल्प या भागात आणले यावर प्रकाश टाकला. लक्ष्मणभाऊंच्या कारकिर्दीत वाकडने अनेक महत्त्वपूर्ण विकास प्रकल्प पाहिले आहेत. आता शंकर जगताप यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यांचा वारसा पुढे अखंडपणे चालणार आहे. या भागाच्या विकास हेच महायुतीचे उद्दिष्ट आहे. याशिवाय, रोजगार निर्मिती, शिक्षणाच्या संधी, पायाभूत सुविधांच्या, स्वच्छता, रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक विकासावरही विशेष भर राहील, असे आमदार अश्विनी जगताप यांनी सांगितले.
या मतदारांच्या घरी दिली आमदार अश्विनी जगताप यांनी भेट..
सविता ननावरे, आनंदा मानकर, बाळासाहेब मानकर, रिद्धी आर्या, हॅपी सिंग, अनिल मानकर, नितीन मानकर, कीर्तिकुमार अगरवाल, शशांक कुलकर्णी, चेतन श्रीराव, रणजित बकाने, श्री मधुबन, संदीप जगताप, सुनील श्रीमंडी, प्रशांत ताळे, महेश देवकर, आशा जगताप, सुजाता सचिन कस्पटे, गणेश चव्हाण.
























Join Our Whatsapp Group