पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेची संगणक प्रणाली नव्याने कार्यान्वित करण्यात येणार आहे. या तांत्रिक कारणामुळे शनिवार दि.२८ एप्रिल ते मंगळवार दि.१ मे या चार दिवसाच्या कालावधीत सर्व्हर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या संगणक प्रणालीशी निगडीत असलेली ऑनलाईन सेवा ४ दिवस बंद असणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांनी पत्रकान्वये दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक महापालिकेच्या ऑनलाईन सुविधेचा मोठ्या संख्येने वापर करतात. यात प्रामुख्याने मिळकत कर, पाणी बिल, विवाह नोंदणी, परवाना, जन्म-मृत्यू नोंदणी, ई-टेंडर, अकाऊंट अशा अनेक सुविधांचा यात समावेश आहे. पिंपरी महापालिकेचे सर्व्हर, डाटा सेंटरमध्ये नव्याने अपग्रेड करण्याचे काम सुरू आहे. या तांत्रिक कारणामुळे २८ एप्रिल ते १ मे या सुट्टीच्या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळेच महापालिकेची ऑनलाईन सुविधा ही चार दिवसांसाठी बंद असणार आहे.
























Join Our Whatsapp Group