पिंपरी (Pclive7.com):- मोशी येथील प्रिस्टीन ग्रीन या उच्चभ्रू सोसायटीत एका भरधाव कारने मावशीसह तिच्या बाळाला उडवले आहे. या भीषण अपघाताचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या अपघातात लहान मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला असून, मावशीलाही गंभीर दुखापत झाली आहे.
१६ जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे, जखमी मुलाच्या वडिलांनी “माझ्याच मुलाची चूक होती, तोच गाडीसमोर धावत आला” असा जबाब पोलिसांना लिहून दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामागे वडिलांवर दबाव असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
























Join Our Whatsapp Group